Wednesday, October 8, 2014

राजकारण

नेत्यांनी बाजार मांडलाय लोकांच्या भावनांचा ।
राजकारण खेळ झालाय कलियुगातल्या रावणांचा ।।

एका फांदीवरून कावळा दुसर्या फांदीवर बसतोय ।
स्वतः केलेली घाण बघून जोर जोरात हसतोय ।
तत्व भावना काही नाही, नुसता काव काव कावळ्यांचा ।।

कोणाला आठवते अस्मिता पाच वर्षे झोपलेली ।
कोणा दिसते विकासाची वाट कधीच नसलेली ।
सगळ्याना वाटतोय हा देश निव्वळ बावळ्याचा ।।

मंत्रीपदाच्या खिरापतीला येतील सगळे एकत्र ।
पाच वर्षे मतदारांना विचारणार नाही साध कुत्रं ।
लोकशाहीची टर उडवताहेत, वीट आलाय ह्या टवळ्यांचा ।।

No comments:

Post a Comment